महिलांसाठी घरबसल्या पैसे कमावण्याचे ५ मार्ग । How To Earn Money From Home For Ladies

परिचय

नमस्कार, आपण घरबसल्या पैसे कमावण्याचे मार्ग शोधात आहात का? तुम्ही गृहिणी असाल, विद्यार्थिनी असाल किंवा फक्त अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याच्या शोधात असाल, तर बाहेर संधींचा एक जग आहे! आर्थिक स्वातंत्र्य ही एक शक्तीवर्धक गोष्ट आहे आणि तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध असल्यामुळे, महिलांना घरबसल्या पैसे कमविण्याचे अधिक पर्याय आहेत. आजच्या डिजिटल युगात, आपली कौशल्ये आणि आवडीनिवडी यांचा वापर करून उत्पन्न मिळवणे आता खूप सोपे झाले आहे. फक्त अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची इच्छा असलेल्या कोणतीही महिला असाल, तुम्हाला या लेखातून प्रेरणा मिळेल. आर्थिक स्वातंत्र्य ही एक सशक्तीकरण करणारी गोष्ट आहे. आणि या How To Earn Money From Home For Ladies लेखाच्या माध्यमातून, आम्ही तुम्हाला घरबसल्या पैसे कमविण्याच्या विविध मार्गांबद्दल माहिती देणार आहोत. चला, या प्रवासाची सुरुवात करूया आणि तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग शोधूया..!

टेलीकॉलिंग वर्क फ्रॉम होम महिलांसाठी (Telecalling Job Work From Home For Ladies)

मित्रांनो आणि भगिनींनो टेलीकॉलिंग आणि BPO क्षेत्रांमध्ये गेल्या काही वर्षात बराच मोठा बदल घडून आला आहे खासकरून COVID नंतर वर्क फ्रॉम होम (work from home) हि संकल्पना वाढीस लागली, याच कल्पनेच्या आधारावर FUTWORK.COM हि कंपनी घरबसल्या पैसे कमावण्याचे मार्ग उपलब्ध करून देते. हे एक आधुनिक साधन आहे, आजच्या जगात हा आहे महिलांसाठी घरबसल्या पैसे कमावण्याचे ५ मार्ग पैकी १ ला मार्ग या बद्दल अधिक माहिती पाहू :

  • कामाची पद्धत (work from home) : विविध प्रकारची टेलीकॉलिंग जसे की, ग्राहकांच्या सोबत संवाद , विक्री कॉल करणे , किंवा त्यांच्ये मत आणि अभिप्राय जाणून घेणे .
  • कामाची वेळ : या कामा मध्ये वेळेचे बंधन नाही आणि हे अँप द्वारे केले जाते त्यामुळे घरबसल्या मोबाइल द्वारे केले जाऊ शकते.
  • किती पैसे कमाऊ शकता : या कामाद्वारे तुम्ही महिन्याला १ ५ ० ० ० /- ते ३ ५ ० ० ० /- पर्यंत कमाऊ शकता.
  • APPLY कसे करावे : Futwork.com वर क्लिक करा वेबसाईट वर सर्व माहिती दिलेली आहे यात तुम्हाला त्यांचे अँप डाउनलोड करायचे आहे त्यानंतर अँपवर रजिस्टर करा,त्यात तुम्हाला ट्रैनिंग १ महिना किंवा १ ५ दिवसांसाठी दिली जाईल त्यात तुम्हाला टेलीकॉलिंग च्या स्किल्स व इतर सर्व गोष्टी शिकवल्या जातील, त्यानंतर पुढील सर्व सूचना पूर्ण केल्या नंतर तुमचे काम सुरु होईल .

पुस्तकांचे समीक्षण (Book Review)

Reedsy.com हि लेखकांसाठी व पुस्तक व्यावसायिकांसाठी एक नावाजलेले व्यासपीठ आहे असे म्हंटले जाऊ शकते. यात Reedsy लेखकांसाठी तर आहेच पण सोबत येथे तुम्ही सुद्धा एक पुस्तक समीक्षक म्हणून स्वतःला जोडून घेऊ शकता, जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर हे काम तुमच्यासाठीच बनलेले आहे असे समजा, कारण Book Review प्रकारामध्ये तुमचे काम पुस्तकं वाचण्याचेच असणार आहे ज्याचे तुम्हाला डॉलर्स मध्ये पेमेंट मिळू शकेल,आता तुम्ही विचार करत असाल कि कुणी फक्त पुस्तक वाचण्याचे पैसे का देईल ? तर असे नसून, यात तुम्हाला त्यांनी दिलेले पुस्तक वाचून पुढे आणखी काही गोष्टी कराव्या लागतील,

  • कामाची पद्धत (work from home) : वेबसाइट वर उपलब्ध विविध प्रकारची पुस्तके वाचून त्याबद्दल प्रामाणिक समीक्षण (review) इतर प्लॅटफॉर्म वर शेअर करणे.
  • कामाची वेळ :वेळेचे बंधन नाही.
  • किती पैसे कमाऊ शकता : 1$ तर 5$ प्रति समीक्षण
  • APPLY कसे करावे : Reedsy.com वर क्लिक करा त्यानंतर रेजिस्ट्रेशन पेज ओपन होईल , यात विचारलेली सर्व माहिती जसे कि पूर्ण नाव,मेल आयडी इ . भरून आपण रेजिस्ट्रेशन करून घ्यावे, त्यानंतर तुम्हाला तुमच्या वाचनाविषयी आवड व तुमच्या विषयी माहिती विचारली जाईल ती भरा यात तुम्हाला विचारले जाईल कि पुस्तक वाचल्यानंतर त्याचे समीक्षण (review )तुम्ही कुठे करणार जसे कि quora,youtube,facebook इ. यानंतर तुम्ही तुमचं समीक्षण (review) कसे देणार म्हणजेच लेखी किंवा विडिओ बनवून अशा काही प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिल्या नंतर तुमचे रेजिस्ट्रेशन पूर्ण होईल. फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरावा जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झाल्यावर तुम्ही तुमचे काम सुरु करू शकता .

टेली असोसिएट (Tele Associate)

या प्रकारामध्ये विचार केल्यास indiamart हे नाव पुढे येते हि एक नावाजलेली कंपनी आहे जी ऑनलाईन मार्केट मध्ये सुप्रसिद्ध आहे यात व्यापारी आणि उद्योजक एकमेकांशी जोडले गेले आहे यावर उत्पादनांची खरेदी विक्री केली जाते यांचे मुख्य कार्यालय हे नोएडा मध्ये आहे. IndiaMart मध्ये टेली सहाय्यक (Tele Associate) पदावरील नोकरी सामान्यत: फोनद्वारे विक्री आणि ग्राहक सेवा कार्यांमध्ये समाविष्ट असते हे सुद्धा महिलांसाठी घरबसल्या पैसे कमावण्याचे मार्ग गृहीत धरले जाऊ शकतात. याबद्दल अधिक माहिती पाहुयात :

  • कामाची पद्धत (work from home) : संभाव्य ग्राहकांना (सप्लायर्स किंवा बायर्स) कॉल्स करणे व लीड्स तयार करून indiamart च्या सेवा सादर करणे व इतर जबाबदारी.
  • कामाची वेळ :सोमवार ते शनिवार काम पेआऊट साठी कमीत कमी ३ तास रोज आणि हफ्त्यातून कमीत कमी ४ दिवस आवश्यक .
  • किती पैसे कमाऊ शकता : २ ५ ० ० ० /- प्रति महीना पर्यंत .
  • आवश्यकता :
    • हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये प्राविण्य.
    • चांगले इंटरनेट असलेल्या संगणक आणि अँड्रॉइड उपकरण (mobile).
    • व्हॉट्सअॅप चालू असलेला मोबाईल नंबर/सिम असणे
    • पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक असणे आवश्यक
    • आपल्या नावावर ऍक्टिव्ह आणि वैध बँक खाते असणे आवश्यक
    • दररोज किमान 3-4 तास काम करण्याची क्षमता असणे
  • APPLY कसे करावे : Indiamart.com ( फक्त महिलांसाठी ) वर क्लिक करा.साइन उप करा व आपल्या डिटेल्स भरा , एक छोटी चाचणी परीक्षा द्यावी लागेल , कंपनी ने सांगितल्याप्रमाणे एक स्वतःचा व्हिडिओ बनवून अँप्लिकेशन फॉर्म वर अपलोड करावा लागेल त्यानंतर त्यानंतर तुम्हाला गरजेचे असलेले सर्व डोकमेंट्स चे फोटो सुद्धा अपलोड करावे लागतील . त्यानंतर वेबसाइट कडून सर्व गोष्टींची तपासणी झाल्यानंतर तुम्हाला तुमचे काम सुरु करता येईल .

स्पीच रेकॉर्डिंग (Speech Recording)

जर तुम्ही असे व्यक्ती असाल, ज्यांना नेहमीसाठीचा वर्क फ्रॉम होम असा जॉब हवा आहे ,त्यांच्या साठी खास असेल हा जॉब, कारण हा जॉब Indian Institute of Science कडून सुरु केला गेलेला प्रोजेक्ट आहे,यांना भारतातील सर्व प्रकारच्या स्थानिक भाषेचे समाज असणारे अँप बनवायचे असल्या कारणाने हे आपल्याला हा जॉब ऑफर करताय , जिथे आपण स्पीच रेकॉर्डिंग (म्हणजेच एखाद्या गोष्टीचा किंवा विषयाचा अनुवाद ) करून आणि इतर बऱ्याच प्रकारचे जॉब्स करून महिना २ ० ० ० ० /- पर्यंत कमाऊ शकतात आणि विशेष म्हणजे यात भाग घेण्यासाठी पुढील माहिती पाहुयात :

  • कामाची पद्धत (work from home) :
    • तुम्हाला काही विशिष्ट विषयांची एक सूची दिली जाईल आणि तुमचे कार्य असेल की तुम्ही दिलेल्या शेती, वित्त, आणि सामान्य क्षेत्रांतील विषयांची वाचन, समजून घेणे आणि परिचय करणे.
    • त्यानंतर तुम्हाला निवडलेल्या भाषेच्या स्थानिक बोलीत लोकांसोबत (मित्र, नातेवाईक इ.) संवाद साधायचा आहे.
    • रेकॉर्डिंग त्या बोलीतून तंतोतंत लिप्यंतरित करायचे आहे आणि दोन्ही रेकॉर्डिंग आणि लिप्यंतरण सबमिट करायचे आहे.
    • रुची असलेल्या उमेदवाराला एक पायलट कार्यामधून जावे लागेल आणि जर त्यांची कार्यक्षमता समाधानकारक असल्याचे आढळले तरच त्यांची नोकरीसाठी निवड केली जाईल.
  • कामाची वेळ : वेळेचे बंधन नाही
  • किती पैसे कमाऊ शकता : ५ ० ० /- प्रति रेकॉर्डिंग पर्यंत (२ ०.मिनिट ) .
  • आवश्यकता :
    • मूलभूत संगणक ज्ञान आणि टायपिंग कौशल्ये असणे आवश्यक आहे.
    • स्थानिक भाषा (स्थानिक बोली तसेच भाषेची मानक आवृत्ती) वाचता आणि समजू शकणे आवश्यक आहे.
    • स्थानिक भाषेशी संबंधित कोर्स किंवा प्रोग्राममध्ये पदवी असणे.
    • त्यांच्या घरी लॅपटॉप / डेस्कटॉप असणे आवश्यक आहे.
    • अँड्रॉइड स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.
    • गुगल डॉक्स, शीट्स, गुगल ट्रान्सलिटरच्या चांगल्या ज्ञान असणे आवश्यक आहे.
    • उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे.
  • APPLY कसे करावे : respin.iisc.ac.in वर क्लिक करा.यानंतर जनरल ओपनिंग्स (General Openings) मध्ये Speech Recording वर क्लिक करा , पुढे एक pdf डाउनलोड होईल त्यात CLICK HERE TO APPLY NOW वर क्लिक करा त्यात एक फॉर्म ओपन होईल,त्यात तुम्हाला तुमच्या बद्दल तुमची मूळ माहिती विचारली जाईल ती चूक न करता पूर्ण भरा,गुगल ड्राईव्ह वर तुमचा रिस्युम अपलोड करून ठेवा व त्याची लिंक टाकायला विसरू नका व फॉर्म सबमिट करा.

यानंतर तुम्हाला १ ० ते १५ दिवसांमध्ये RESPIN कडून कॉल किंवा मेल आयडी वरून तुम्ही फॉर्म भरला त्या मेल वर कॉन्टॅक्ट केला जाईल,असे न झाल्यास तुम्ही परत एकदा APPLY करू शकता .

जिओ स्मार्ट FSM

मित्रांनो आणि भगिनींनो जिओ मोबाईल बद्दल आपण सर्वांना माहीतच आहे, पण जिओ सोबत आपण घरी बसून काम करून पैसे कमाऊ शकतो हे भरपूर कमी लोकांना माहित आहे, हा जॉब तरुण ,विद्यार्धी , गृहिणी व इतर कुणीही ज्यांना संगणक ज्ञान आहे आणि संभाषण कौशल्य ज्यांच्याकडे आहे ते हा जॉब निश्चितच करू शकता. इथे तुमची मुलाखतीची पद्धत सोप्पी आहे जेणे करून तुमची निवड आरामात होऊ शकते .

  • कामाची पद्धत (work from home) : विविध प्रकारची टेलीकॉलिंग जसे की, ग्राहकांच्या सोबत संवाद , त्यांच्या शंका आणि तक्रारींचे समाधान फोन कॉल द्वारे करणे .
  • कामाची वेळ :
  • किती पैसे कमाऊ शकता :
  • APPLY कसे करावे : प्रथम आपल्या मोबाइलमध्ये JioSmartFSM अँप आणि Jio Careers अँप इन्स्टॉल करा, साइन उप करून प्रोफाइल अपडेट करा आणि resume अपलोड करा. Job Search मध्ये freelancer निवडा आणि jio customer associate ला अप्लाय करा. अँपमध्ये एक टेस्ट द्या. २४ तासांत निवड झाल्यास, मेलमध्ये id आणि password मिळेल ज्याने JioSmartFSM अँपवर काम सुरू करू शकता.

निष्कर्ष

घरी बसून काम करून पैसे कमावणे आता केवळ स्वप्न उरले नाही, तर एक वास्तव बनले आहे. टेलीकॉलिंग, पुस्तक पुनरावलोकन, टेली असोसिएट, स्पीच रेकॉर्डिंग, आणि जिओ स्मार्ट FSM सारख्या विविध संधींमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे अधिक सोपे झाले आहे. या सर्व संधी वापरून, तुम्ही तुमच्या कौशल्यांचा वापर करून आणि थोडा वेळ गुंतवून महिन्याला चांगले उत्पन्न मिळवू शकता घरबसल्या पैसे कमावण्याचे मार्ग जर तुम्ही शोधात असाल तर ह्या लेखाबद्दल तुम्ही नक्की विचार करावा .

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

  1. घरबसल्या टेलीकॉलिंगमध्ये पैसे कसे कमवता येतील?
    • Futwork.com सारख्या प्लॅटफॉर्म्सवर नोंदणी करा, त्यांच्या मार्गदर्शनानुसार कामे करा आणि ग्राहकांशी संवाद साधून विक्री किंवा ग्राहक समर्थन कार्ये पार पाडा.
  2. पुस्तकांचे समीक्षण करून किती पैसे मिळवू शकतो?
    • Reedsy.com सारख्या व्यासपीठांवर तुम्हाला दर समीक्षणावर $1 ते $5 मिळू शकते.
  3. IndiaMart टेली असोसिएट पदासाठी काय आवश्यक आहे?
    • हिंदी आणि इंग्रजी भाषांचे ज्ञान, चांगले इंटरनेट कनेक्शन, अँड्रॉइड डिव्हाइस, पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक, आणि दररोज किमान 3-4 तास काम करण्याची क्षमता.
  4. स्पीच रेकॉर्डिंगमध्ये किती पैसे कमवता येतील?
    • प्रति रेकॉर्डिंग (20 मिनिट) तुमच्या कामाचे शुल्क साधारणतः 500 रुपये असू शकते.
  5. जिओ स्मार्ट FSM जॉबसाठी कसे अर्ज करावे?
    • JioSmartFSM आणि Jio Careers अ‍ॅप्स डाउनलोड करा, रजिस्ट्रेशन करा, प्रोफाइल अपडेट करा आणि जॉब सर्चमध्ये freelancer जॉब साठी अप्लाय करा.

अस्वीकरण (Disclaimer)

“महिलांसाठी घरबसल्या पैसे कमावण्याचे ५ मार्ग । How To Earn Money From Home For Ladies हा लेख केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. लेखक किंवा प्रकाशक कोणत्याही प्रकारचे वचन देत नाहीत. दिलेल्या संधींचा वापर करण्यापूर्वी वाचकांनी स्वतःचे संशोधन करावे आणि व्यावसायिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. माहितीच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लेखक किंवा प्रकाशक उत्तरदायी नाहीत. या ब्लॉगवरील माहितीचा उपयोग वाचकांच्या जबाबदारीवर आहे. तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास, कॉमेंटमध्ये विचारू शकता.” 😊📄💡

घरबसल्या पैसे कमावण्याचे मार्ग ह्या लेख व्यतिरिक्त आणखी माहिती हवी असल्यास आपण आमचा आणखी एक लेख How To Earn Money Online वाचू शकता आशा आहे कि हि माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरेल…!

Hello friends, my name is Vaibhav I am the founder and lead writer of this blog. Through this platform, I provide comprehensive information on financial growth, money management, income-generating skills, and effective learn-and-earn methods. Join me on this journey to enhance your financial knowledge and skills.

शेअर करा:

Leave a Comment