परिचय
“चार्ट पॅटर्न्सची ओळख” या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंग जगतात चार्ट पॅटर्न्स हे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. ते मार्केटमधील मूव्हमेंट्स, ट्रेंड्स, आणि भविष्यातील महत्त्वपूर्ण संकेत देतात. Types of Chart Patterns या ब्लॉगमध्ये, आपण चार्ट पॅटर्न्स म्हणजे काय, त्यांचा वापर कसा करावा, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पॅटर्न्सची ओळख कशी करावी याबद्दल चर्चा करणार आहोत. चार्ट पॅटर्न्सची समज घेतल्यावर, ट्रेडर्सना अधिक बुद्धिमत्तेने आणि आत्मविश्वासाने मार्केट मध्ये ट्रेडिंगचे निर्णय घेता येतात.
ह्या ब्लॉगच्या माध्यमातून, ट्रेडिंगच्या जगात पाऊल टाकणाऱ्यांसाठी उपयोगी असलेल्या महत्त्वाच्या पॅटर्न्स बद्दल माहिती मिळवण्यासाठी तयार राहा. चला तर मग, सुरूवात करूया !
चार्ट पॅटर्न म्हणजे काय ?
चार्ट पॅटर्न्स टेक्निकल ॲनालिसिसचा महत्त्वाचा घटक आहे. स्टॉकच्या प्राईस बदलाचे हे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे, जे भूतकाळातील आणि वर्तमानातील प्राईसवर आधारित असते. या पॅटर्न्समुळे मार्केट मधील ट्रेडर्सची मानसिकता आणि सामूहिक वर्तवणूक प्रकट होते, ज्यामुळे भविष्यकालीन प्राईस वाढणार की घटणार याचा अंदाज घेता येतो.
चार्ट पॅटर्न्स खरेदी करणारे आणि विक्री करणारे यांच्यामध्ये प्राईसच्या संघर्षात कोण जिंकणार हे ठरवण्यास मदत करतात, जेणेकरून स्टॉकचा भाव वाढेल किंवा घटेल हे कळते. यशस्वी ट्रेडर होण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी चार्ट पॅटर्न्सचा अभ्यास करणे आवश्यक आहे आणि स्टॉकच्या भावात कसे बदल होतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. यासाठी नियमित सराव करणे महत्त्वाचे आहे. दररोज विविध स्टॉक्सचे चार्ट पाहण्याची सवय लावा.तुम्ही सर्व लाईव्ह चार्ट्स पाहण्यासाठी NSE किंवा BSE च्या वेबसाईट वर जाऊन चेक करू शकता.
चार्ट पॅटर्न चे प्रकार
टेक्निकल ॲनालिसिसला एक कला म्हणून समजून घ्या, त्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होतील. टेक्निकल ॲनालिसिसच्या दोन प्रमुख गोष्टी म्हणजे प्राईसमध्ये ट्रेंड दिसतो आणि इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो. हे लक्षात ठेवल्याने तुमचा पुढचा मार्ग सुलभ होईल.
डिमांड आणि सप्लाय कसे कार्य करतात हे तुम्हाला माहित आहे. जर मार्केटमध्ये तेजी असेल, तर डिमांड जास्त आणि सप्लाय कमी आहे, याचा अर्थ खरेदीदारांची संख्या जास्त आहे. तसंच, मार्केटमध्ये मंदी असेल तर सप्लाय जास्त आणि डिमांड कमी आहे, याचा अर्थ विक्रेते जास्त आहेत. मात्र, परिस्थिती कायम तशी राहणार नाही. जेव्हा परिस्थिती बदलते, तेव्हा चार्ट पॅटर्न दिसू लागतात. चार्ट पॅटर्न्स मुख्यतः दोन भागांत विभागले जाऊ शकतात.
- रिव्हर्सल पॅटर्न (Reversal Pattern)
- कन्टीनुएशन पॅटर्न (Continuation Pattern)
रिव्हर्सल पॅटर्न
रिव्हर्सल चा संकेत देणारे चार्ट पॅटर्न्स तयार होत असताना, शेअर्स किंवा मार्केटमध्ये एकाच वेळी वाढ किंवा घटीनंतर ट्रेंड उलटणार म्हणजेच रिव्हर्सल येणार असं सूचित होतं. तेजीच्या स्थितीत असा पॅटर्न मंदीचा संकेत देतो, आणि मंदीच्या स्थितीत असा पॅटर्न तेजीचा संकेत देतो.
नेहमी लक्षात ठेवा की असा संकेत मिळाल्यानंतर इतर गोष्टी विचारात घेऊन जेव्हा एकापेक्षा जास्त इंडिकेटर्ससुद्धा असा संकेत देतात आणि चार्ट पॅटर्नमध्येही असा संकेत आढळतो, तेव्हा त्वरित योग्य निर्णय घेऊन ट्रेड करावा. आणि नेहमी असं दिसतं की इथे इतिहासाची पुनरावृत्ती होते. हे समजण्यासाठी, खालील काही रिव्हर्सल पॅटर्न्सची उदाहरणं दिली आहेत, ती समजून घेऊया.
हेड अँड शोल्डर पॅटर्न
हेड अँड शोल्डर पॅटर्न (Head and Shoulder Pattern) हे एक रिव्हर्सल पॅटर्न आहे जे मुख्यतः तेजी असताना दिसून येते. खालील प्रमाणे :

स्पष्टीकरण :
- भाव एक स्तरावर विक्री करून एका खालच्या स्तरावर सपोर्ट घेतो, ज्याला आपण नेकलाईन म्हणतो. चित्रात दाखविल्याप्रमाणे.
- भाव सुधारण्याआधी परत सपोर्ट घेतो, ज्यामुळे लेफ्ट शोल्डर तयार होते.
- नेकलाईनवर परत खरेदी सुरू होते, जी पुढील हाय (High) च्या वर जाऊन नवीन हाय भाव तयार करते, ज्याला आपण हेड (Head) म्हणतो.
- पुन्हा विक्रीमुळे भाव घटतो आणि नेकलाईनवर सपोर्ट घेतो.
- नेकलाईनवर परत खरेदी दिसल्यास भाव वाढतो, परंतु पुढील हाय पर्यंत पोहोचत नाही आणि खालचा टॉप तयार करून परत फिरतो. हा खालचा टॉप तयार झाल्यानंतर त्या आकृतीला ‘राईट शोल्डर’ म्हणतात.
- फरक असा आहे की, या वेळी भाव घटून नेकलाईनवर सपोर्ट घेत नाही, परंतु नेकलाईनला तोडून अधिक घटतो, जे रचनेतील ब्रेकआऊट दर्शवते.
- चार्ट पॅटर्न पूर्ण झाल्यानंतर भाव अधिक घटताना दिसतो.
- या रचनेत व्हॉल्युमचे महत्त्व खूप आहे. डावे शोल्डर तयार होते तेव्हा व्हॉल्युम अधिक असते.
- हेड तयार होते तेव्हा व्हॉल्युम घटतो, जो दुर्बलतेचा संकेत देतो.
- जेव्हा शोल्डर तयार होते, तेव्हा व्हॉल्युममध्ये अधिक घट दिसते, जे खरेदी करणारे थकले आहेत हे दर्शवते. त्यानंतर नवीन विक्री सुरू होते आणि विक्री करणाऱ्यांची पकड मजबूत होते.
- मागील नेकलाईन तुटल्यावर वाढणारा व्हॉल्युम सोबत घटतो.
इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न
हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न अनेकदा उलटे पण बनते. ज्याला आपण इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर असे म्हणतो .

स्पष्टीकरण :
- हे चार्ट पॅटर्न मंदीमध्ये तयार होते, ज्यामुळे असे दर्शवले जाते की विक्री करणारे थकले आहेत आणि खरेदी करणाऱ्यांनी खरेदी करण्याची उत्सुकता दाखवली आहे. त्यामुळे डावे शोल्डर तयार होते. परंतु, पुन्हा विक्री करणारे सक्रिय होतात आणि भाव नवीन लो (low) बनवतो, पण डावे शोल्डर बनले त्यापेक्षा कमी व्हॉल्युमने, ज्याला आपण हेड म्हणतो.
- खरेदी करणारे पुन्हा खरेदीला सुरुवात करतात आणि मजबूत पुलबॅक येतो, जो नेकलाईनपर्यंत पोहोचतो.
- नवीन आणि मर्यादित सप्लायमुळे भाव थोडासा घटतो आणि नेकलाईनवर किंवा त्याच्या जवळ सपोर्ट घेतो, ज्यामुळे उजवे इन्व्हर्टेड शोल्डर तयार होते आणि भाव पुन्हा वाढू लागतो. हे खूप जास्त व्हॉल्युमसह होते आणि भाव नेकलाईन पार करून तेजी वाढते, ज्यामुळे हे चार्ट पॅटर्न पूर्ण होते. याला आपण इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणतो.
रायझिंग व्हेज
हे चार्ट पॅटर्न येणाऱ्या मंदीची आपल्याला पूर्व सूचना देते .

स्पष्टीकरण :
- या रचनेत सुरुवातीला भावामध्ये वाढ आणि घट होते आणि पुढे जाऊन ही वाढ आणि घट सीमित होते, मोमेंटम घटतो. यामुळे हे एक ट्रायंगल सारखे चार्ट पॅटर्न तयार करते, ज्याचा रोख वरच्या दिशेत असतो.
- चित्रात दाखविल्याप्रमाणे, शेअर्सचा भाव वरच्या दिशेत धीम्या गतीने वाढून वरचा अवरोध देणाऱ्या ट्रेंड लाईनवर अडकून शेवटी खालच्या ट्रेंड लाईनला तोडतो आणि मंदीची सुरुवात होते.
- हे अधिक सोपे बनवते कारण हे चार्ट पॅटर्न पूर्णतेच्या टप्प्यात आल्यावर सूचक ओव्हरबॉट झालेले दिसतात. मागील सपोर्ट तुटल्यावर मंदीची स्थिती पुढे वाढते.
फॉलिंग व्हेज
हे चार्ट पॅटर्न तेजीचा संकेत देते. या रचनेमुळे प्रत्येक घट ही विक्रीमुळे होते आणि कमी कालावधीत तेजीची सुरुवात होऊ शकते. जेव्हा वरचा महत्त्वाचा अवरोध ओलांडला जातो तेव्हा तेजीची सुरुवात होते.

स्पष्टीकरण :
- हे चार्ट पॅटर्न मुख्यतः तेजीत दिसते, परंतु ती मंदीमध्येही दिसू शकते आणि अशा स्थितीतही तेजीचा संकेत देते.
- पोझिशन घेण्याआधी खात्री करणे हितकारक असते.
- सर्व सूचक तपासल्यानंतरच खरेदीला सुरुवात करावी.
डबल बॉटम
या रचनेत घसरणारा भाव थोडा वाढून पुन्हा त्याच स्तरावर किंवा त्या स्तराच्या जवळपास फिरून सपोर्ट घेऊन सुधारतो. जेव्हा दोनदा सपोर्टची तपासणी होते, तेव्हा या रचनेला आपण डबल बॉटम म्हणतो.

स्पष्टीकरण :
जेव्हा दोन बॉटम तयार होतात, तेव्हा त्यांच्या दरम्यानचे अंतर किती दिवसांचे आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कमी कालावधीच्या दृष्टीकोनातून, जर दोन स्पोर्ट्समध्ये ३ ते ४ आठवड्यांचे अंतर असेल तर तर ते चार्ट पॅटर्न मजबूत मानले जाते.
त्याचप्रमाणे, माध्यम कालावधीसाठी हे अंतर ३ ते ५ महिन्यांचे असू शकते. हा काही ठोस नियम नाही आणि यामध्ये वाढणारे किंवा घटणारे अंतर देखील लक्षात घेऊन त्याचा फायदा घेतला जाऊ शकतो.
या रचनेत दुसरा बॉटम तयार होण्यापूर्वी एक टॉप बनतो. याठिकाणाहून दुसरा बॉटम तपासला जातो आणि भाव वरच्या दिशेने वाढू लागतो. जेव्हा भाव पूर्वी बनलेल्या टॉपला पार करतो, तेव्हा तेजी अधिक मजबूत होते.
डबल टॉप
या रचनेत भाव एकदा अवरोध निर्माण करून टॉप तयार करतो आणि नंतर घटतो, ज्याचा बोत्तोम थोडा वरच्या स्तरावर तयार होतो. थोड्या कालावधीत भाव पुन्हा वाढतो आणि पुन्हा अवरोध निर्माण करतो, पण तो अगोदरच्या टॉप जवळ पोहोचून घटू लागतो. यामुळेच या रचनेला आपण डबल टॉप म्हणतो.

स्पष्टीकरण:
- कमी कालावधीच्या चार्ट पॅटर्न्सच्या अभ्यासात दोन दोषांदरम्यान ३ ते ४ आठवड्यांचे अंतर योग्य मानले जाते.
- माध्यम कालावधीच्या चार्टच्या अभ्यासात दोन टॉप्स दरम्यान ३ ते ५ महिन्यांचे अंतर योग्य असते.
- दीर्घ कालावधीच्या चार्टच्या अभ्यासात दोन टॉप्सच्या दरम्यान १ ते २ वर्ष किंवा त्याहून अधिक अंतर असू शकते.
- या टाइम फ्रेममध्ये थोडी जास्त वाढ आणि घटाचे प्रमाण स्थितीप्रमाणे बदलते. अभ्यासानुसार आवश्यक बदल केले जाऊ शकतात.
- या रचनेत दुसरे टॉप बनण्यापूर्वी त्या घाटी दरम्यान ‘लो’ (Low) बनतो आणि भाव जेव्हा दुसरे टॉप बनवतो तेव्हा घाटी दरम्यान खालच्या स्तराला तोडतो, ज्यामुळे मंदी अधिक गंभीर होते.
राऊंडिंग बॉटम
हि एक दीर्घ कालावधीच्या चार्टवर अधिक महत्त्वाची रचना आहे. या पट्टेर्नला तयार होण्यासाठी आणि पूर्ण होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.

स्पष्टीकरण:
- दैनिक किंवा साप्ताहिक चार्टमध्ये तयार झालेल्या पॅटर्न वेगवेगळ्या टाइम फ्रेममध्ये असल्या तरी परिणाम सारखाच असतो. परंतु, जेव्हा साप्ताहिक आणि मासिक चार्टवर या पॅटर्न ची सुरुवात दिसते, तेव्हा त्यांचे महत्त्व वाढते आणि त्यानंतरचा सुधार खूपच गंभीर असतो.
- हे पॅटर्न दीर्घ कालावधीच्या मंदी आणि कन्सॉलिडेशननंतर धीम्या सुधारणेसोबत तेजीच्या दिशेने जाणाऱ्या स्थितीच्या संकेत देतात.
- राऊंड बॉटमचा उपयोग भावाच्या भविष्यातील अंदाजासाठी केला जाऊ शकतो.
- राऊंड बॉटममध्ये, जेव्हा पहिल्या स्तरावरून भाव घटतो आणि लांब कन्सॉलिडेशननंतर कपच्या आकारासारखी पॅटर्न तयार होते, तेव्हा असे म्हणता येते की भाव पुन्हा वाढत जाऊन भूतकाळातील उंच स्तरावर पोहोचू शकतो, जिथे कपचा आकार पूर्ण होतो आणि त्या स्तरावरून पुढेही वाढतो.
- अशा राउंड बॉटमची रचना दीर्घ कालावधीच्या चार्टवर तयार होताना दिसली, तर गुंतवणूक करून पुढे गेल्यास फायदा होतो.
कन्टीनुएशन चार्ट पॅटर्न (Continuation Pattern)
कन्टीनुएशन चार्ट पॅटर्न मध्ये तेजीकडील शेअर्स मध्ये काही काळासाठी येणारे कन्सॉलिडेशन नंतर येणाऱ्या तेजीचा संकेत मिळतो . म्हणजेच अशी चार्ट पॅटर्न्स जी मार्केटच्या किंमतीच्या चालू ट्रेंडचा किंवा दिशा कायम ठेवण्यासाठी दिसतात. हे पॅटर्न्स, असलेल्या ट्रेंडचा नवा पैलू किंवा एकसारखी सुरूवात दर्शवतात. या पॅटर्न्सच्या मदतीने ट्रेडर्सला तीच दिशा चालू ठेवण्याची शक्यता दिसते.खाली काही कन्टीनुएशन पॅटर्न चे उदाहरण दिलेले आहेत ते समजून घेऊयात
समकोन त्रिकोण
सामान्य त्रिकोण पॅटर्न (Symmetrical Triangle Pattern) एक चार्ट पॅटर्न आहे जो मार्केट मध्ये कन्सोलिडेशन किंवा एका विशिष्ट श्रेणीत किंमतींची घसरण किंवा चढाई दर्शवतो. या पॅटर्नमध्ये किंमती एक वर्तुळाकार त्रिकोणाकडे सरकत जातात, ज्यात वर आणि खाली किंमतींचे स्तर घटत जातात.

स्पष्टीकरण:
- या चार्ट पॅटर्नमध्ये दोन तासांवर किंमती उच्चतम आणि नीचतम पातळ्यांपर्यंत पोहोचतात.
- वर आणि खाली दोन्ही किमती एकाच दिशेने कमी होत असतात, ज्यामुळे त्रिकोण आकार तयार होतो.
- मार्केट एका ठराविक श्रेणीत कन्सोलिडेट होतो, म्हणजे किंमती काही काळासाठी एका पातळीवर राहतात, आणि नंतर एक मोठा ब्रेकआउट होतो.
असेंडिंग त्रिकोण
हि एक तेजीचा संकेत देणारे चार्ट पॅटर्न आहे.

स्पष्टीकरण:
- हे चार्ट पॅटर्न मुख्यतः तेजीमध्येच तयार होताना दिसते, आणि कधी कधी मंदीमध्ये तयार झाली तरीही ही रचना तेजीचाच संकेत देते.
- या रचनेत एका निश्चित स्तरावर अवरोध येताना दिसतो, परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक घटाला सपोर्ट उंच आणि अधिक उंच होत जातो, जो वाढ-घट आणि वाढीचा ट्रेंड दर्शवतो, आणि जो तेजीची निशाणी असतो.
- हे पॅटर्न दर्शवते की जाणकार लोक खरेदी करत आहेत.
- जेव्हा पॅटर्न पूर्णतेजवळ येते, तेव्हा वाढ-घट कमी होत जाते आणि एका स्तरावर भाव सुधारण्यापेक्षा अधिक व्हॉल्यूमने वरच्या अवरोधाला पार करण्यात यशस्वी होतो. तेव्हा खरेदीचा संकेत मिळतो आणि तेजीची सुरुवात होते.
- जोपर्यंत तेजी-मंदीच्या या खेळात तेजीवाले जिंकत नाहीत, तोपर्यंत खरेदीपासून लांब राहावे, कारण हे पॅटर्न पूर्ण होईपर्यंत भाव एका निश्चित रेंजमध्ये अडकलेले असतात. एकदा का भाव वर दिलेल्या चित्रप्रमाणे वरचे किंवा खालचे ब्रेकआऊट झाल्यानंतर, समांतर ट्रेंडलाईनवर भाव किती पुढे वाढेल याचा संकेत मिळवला जाऊ शकतो.
डिसेंडिंग त्रिकोण
हि एक मंदीचा संकेत देणारे पॅटर्न आहे

स्पष्टीकरण:
- या रचनेत, शेअर्सचा भाव एका स्तरावर सतत सपोर्ट घेताना दिसतो. परंतु प्रत्येक वाढ खालचा आणि अधिक खालचा टॉप तयार करते, जो दुर्बलतेचा संकेत आहे.
- जेव्हा हे पॅटर्न पूर्ण होते, तेव्हा भाव सतत सपोर्ट घेऊन वाढणाऱ्या व्हॉल्युमसह खालच्या स्तराला तोडतो, ज्यामुळे विक्रीचा संकेत मिळतो आणि मंदीची स्थिती वाढते.
- हे पॅटर्न प्रत्येक वाढीसोबत विक्रीची संधी देते, ज्यामुळे विक्री करणाऱ्यांना चांगला फायदा होतो. अशा सपोर्टला लक्षात घेऊन खरेदी करायची असल्यास, अवरोधाजवळ अचूक जावे लागते, नाहीतर तुम्ही फसू शकता.
- थोडक्यात, प्रत्येक वाढीसोबत विक्रीची संधी मिळते आणि शेवटच्या सपोर्टला तोडल्यास मंदीची स्थिती वाढते.
फ्लॅग पॅटर्न
ही एक कमी कालावधीची रचना आहे, ज्यामध्ये भाव काही कालावधीसाठी कन्सॉलिडेट झाल्यानंतर पुढे वाढतो आणि तेजीच्या दिशेने नवीन स्तर बनवतो.

स्पष्टीकरण:
- या रचनेत मध्यवर्ती वाढीनंतर भाव काही कालावधीसाठी कन्सॉलिडेट होतो, जे आपण वरच्या चार्टमध्ये पाहू शकता.
- हे पॅटर्न आयताकृतीसारखी दिसते, परंतु थोडा वरच्या किंवा खालच्या दिशेने झुकाव असतो.
- जर स्थिर ट्रेंड वरच्या दिशेने असेल, तर फ्लॅग पॅटर्नमध्ये स्लोप खालच्या बाजूला दिसतो.
- जर स्थिर ट्रेंड खालच्या दिशेने असेल, तर फ्लॅग पॅटर्नमध्ये स्लोप वरच्या बाजूला दिसतो.
- जेव्हा वाढत्या व्हॉल्युमसह ब्रेकआऊट येतो, तेव्हा कन्सॉलिडेशननंतर भाव पुन्हा पुढे वाढताना दिसतो.
- थोडक्यात, फ्लॅग पॅटर्न तेजीच्या दिशेने असलेल्या रचनेच्या संकेत देतो आणि भाव काही काळ कन्सॉलिडेट झाल्यानंतर पुन्हा वाढू लागतो.
रेक्टॅंगल
जेव्हा शेअर्स किंवा मार्केट निश्चित रेंजमध्ये व्यापार करत असतात, तेव्हा रेक्टॅंगल पॅटर्न दिसू शकतो.

स्पष्टीकरण :
- या पॅटर्नमध्ये, वरच्या पातळीवर विक्री आणि खालील पातळीवर खरेदी करून त्या रेंजचा फायदा घेतला जाऊ शकतो.
- पण जर मागील टॉप पूर्वीच्या टॉपपेक्षा कमी झाले, तर ट्रेड करताना सतर्क राहणे आवश्यक आहे, कारण या वेळी खालील दिशेतील ब्रेकआउट होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे, त्या पातळीवर खरेदी करणे जोखिमीचे ठरू शकते.
- त्याचप्रमाणे, जर मागील बॉटम पूर्वीच्या बॉटमपेक्षा उच्च स्तरावर तयार झाला, तर पुढे जाऊन वरच्या दिशेतील ब्रेकआउट होण्याची शक्यता जास्त असते.
कप अँड हॅन्डल
कप अँड हॅंडल एक कन्सॉलिडेशन आणि कॅन्टीन्यूएशन पॅटर्न आहे, जो सकारात्मक ब्रेकआउटच्या नंतर सुधारित वाढीचा संकेत देतो.

स्पष्टीकरण :
- या पॅटर्नमध्ये थोड्या सुधारानंतर एक विक्री दिसून येते, जी पॅटर्नच्या सुरुवातीच्या भागाचे निर्माण करते. विक्री झाल्यावर किंमती कन्सॉलिडेट होतात आणि चार्टवर हॅंडलसारखी रचना दिसते.
- नंतर, हॅंडलच्या संरचनेतून बाहेर पडून सकारात्मक ब्रेकआउट झाल्यानंतर, आधीच सुरू असलेली तेजीची ट्रेंड पुढे वाढते.
- कप पॅटर्न अर्धगोलाकार रचनेसारखा असतो. याचा अर्थ असा की, आधीच स्थापित असलेल्या तेजीत कन्सॉलिडेशनचा कालावधी सुरू आहे.
- जर सकारात्मक ब्रेकआउट झाला आणि त्याच वेळी व्हॉल्यूममध्ये वाढ झाली, तर पुढे येणारा ट्रेंड मजबूत असण्याची शक्यता असते.
- प्रत्येक चार्ट पॅटर्नप्रमाणे, लहान-मोठ्या आणि अल्पकालीन गोंधळाऐवजी, या पॅटर्नमध्ये दीर्घकालीन परिणामावर लक्ष केंद्रित करून पोजिशन घ्यावी.
प्राईस चॅनेल

प्राइस चॅनल एक प्रकारचा चार्ट पॅटर्न आहे ज्यामध्ये किंमती दोन समानांतर रेषांमध्ये व्यापारी असतात, या रेषा सपोर्ट (खालील रेषा) आणि रेजिस्टन्स (वरच्या रेषा) म्हणून कार्य करतात. हे पॅटर्न एक दिशा, ट्रेंडच्या स्थिरतेला आणि संभाव्य ब्रेकआउट किंवा ब्रेकडाउनला दर्शवते.
स्पष्टीकरण :
- प्राइस चॅनलच्या खाली आणि वर दोन्ही किंमती एक समांतर किमतीच्या श्रेणीमध्ये व्यापारी होतात.
- सपोर्ट रेषा किंमतीला खाली जाऊ देत नाही आणि रेजिस्टन्स रेषा किंमतीला वर जाऊ देत नाही.मार्केट किती वेळा चॅनलच्या दोन्ही काठांवर किंमत पाऊंठत आहे हे पाहून त्याचे विश्वासार्हता मोजता येते.
- प्राइस चॅनल व्यापार्यांना ट्रेंड ओळखण्यास मदत करतो. तुम्ही हे ओळखू शकता की मार्केट चालू असलेल्या दिशेत किंवा त्याच्या विरोधात कसे वागेल.
- एक वेळ, किंमत चॅनलच्या बाहेर जाऊन ब्रेकआउट करू शकते. या वेळी ब्रेकआउटच्या दिशेने व्यापार करून नफा मिळवता येतो.
- प्राइस चॅनलमध्ये व्यापार करणे कधीकधी कन्सोलिडेशन फेज असतो, जेव्हा किंमत एका निश्चित श्रेणीत राहत असते. हा कालावधी सामान्यतः सुरक्षित आणि स्थिर असतो.
- चॅनलच्या वरच्या किंवा खाली ब्रेकआउट होण्यावर आधारित ट्रेडिंग सुरू करू शकता. उदाहरणार्थ, चॅनलच्या वरच्या रेषेच्या बाहेर किंमत गेल्यास, बुलिश ब्रेकआउट मानले जाऊ शकते. चॅनलच्या खाली किंमत गेल्यास, बेअरिश ब्रेकडाउन होईल.
- वॉल्यूममध्ये वाढ होणे ब्रेकआउटच्या विश्वासार्हतेला समर्थन देते. जर ब्रेकआउट व्हॉल्यूम वाढीसह होतो, तर तो अधिक प्रभावी असू शकतो.
निष्कर्ष
चार्ट नमुने समजून घेणे कोणत्याही व्यापार्यासाठी आवश्यक आहे. जरी ते किमतीच्या हालचालींचा अंदाज लावण्याचा एक शक्तिशाली मार्ग प्रदान करतात, तरीही त्यांचा वापर वेगळेपणाने करू नये. इतर तांत्रिक साधनां आणि जोखीम व्यवस्थापन धोरणांसह त्यांचे एकत्रिकरण तुमच्या व्यापार यशात लक्षणीय सुधारणा करेल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- सर्वात विश्वासार्ह चार्ट नमुना कोणता आहे?
- हेड आणि शोल्डर नमुना वारंवार सर्वात विश्वासार्ह उलटा नमुना मानला जातो.
- चार्ट नमुने सर्व मार्केटसाठी वापरले जाऊ शकतात का?
- होय, चार्ट नमुने स्टॉक्स, फॉरेक्स, क्रिप्टोकरन्सी आणि वस्तूंमध्ये कार्य करतात.
- चार्ट नमुने मास्टर करण्यासाठी किती वेळ लागतो?
- तुमच्या शिकण्याच्या गतीवर अवलंबून आहे, पण सुसंगत सरावाने तुम्ही काही महिन्यांत प्रवीणता मिळवू शकता.
- यशस्वी ट्रेडिंगसाठी केवळ चार्ट नमुनेच पुरेसे आहेत का?
- नाही, चार्ट नमुन्यांसह इतर तांत्रिक निर्देशक आणि जोखीम व्यवस्थापन धोरणांचे संयोजन करणे महत्त्वाचे आहे.
- नकली आणि वास्तविक ब्रेकआउटमध्ये कसे फरक करायचा?
- नेहमी ट्रेडिंग व्हॉल्युम तपासा—वास्तविक ब्रेकआउट वाढीव खंडासह घडतात, तर नकली ब्रेकआउटमध्ये मजबूत खंड नसतो.
“अस्वीकरण :- या ब्लॉगमध्ये दर्शवलेली सर्व चित्रे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने तयार केलेली आहेत. Price chart वरील ही चित्रे फक्त ट्रेडिंगबद्दल माहिती व शिक्षणाच्या हेतूने वापरली जातात. जर कोणत्याही चित्रांच्या वापरासंबंधित हक्कबाध्यता किंवा आक्षेप असेल, तर कृपया आम्हाला संपर्क साधा. त्वरित ती चित्रे काढून टाकण्यात येतील.”
“टेक्निकल ॲनालिसिस कोर्स मधील भाग – 4 आपल्याला आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका .. आणि पुढील भागासाठी येथे क्लिक करा “👈